अक्षराच्या शिक्षणासाठी धावली शिवसेना !

मुंबई, दि १४
आर्थिक परिस्थिती संघर्ष करित मुंबई महानगरपालिकेच्या २४८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून तब्बल ९७.००% गुण मिळवून मुबंईत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या लोअर परळच्या *लक्ष्य अकॅडमीच्या *कु. अक्षरा वर्मा* या हुशार विद्यार्थ्यांनीला भारतीय कामगार सेना सहचिटणीस, कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करत तिच्या पुढील शिक्षणासाठी *२५,००० रुपयांच्या धनादेश सुपूर्द केला. अक्षराचे वडील टॅक्सी चालवतात तर तिची आई घरी टेलरिंग चे काम करते त्यांची घरची परिस्थिती अत्यंत मित्राची असल्याने त्यांना पुढील शिक्षण घेणे फार अवघड जात होते. याची माहिती मिळताच कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी आपले एक पाऊल पुढे टाकून दिला आर्थिक मदत केल्याबद्दल विविध समाजातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निशिकांत शिंदे यांनी युवासेना पदाधिकाऱ्यांसोबत कु. अक्षराच्या घरी जाऊन तिचे व कुटुंबीयांचे कौतुक केले व आर्थिक अडचणींवर मात करून मिळवलेल्या या यशाची दखल घेत तिचे विशेष अभिनंदन करीत *२५,००० रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला*. यावेळी त्यांनी मेडिकल क्षेत्रात जाऊन *’डॉक्टर’* होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अक्षराला पुढील शिक्षणासाठी सहकार्य करण्याबाबत आश्वस्त करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
आम्ही अत्यंत गरीब परिस्थितीतून आलो असून मी देखील एक स्वतः गिरणी कामगाराचा मुलगा आहे. आमच्या वेळेला शिक्षण घेणे फार अवघड होते. याची आम्हाला जाणीव आहे या जाणिवेतूनच आम्ही अक्षराला मदत करण्यासाठी पुढे आलो असून यापुढे देखील दिला शैक्षणिक मदत करण्यासाठी नेहमी सहकार्य करण्यात असल्याची माहिती कामगार नेते निशिकांत शिंदे यांनी दिली.
यावेळी लक्ष्य अकॅडमीचे प्रसाद सावंत, शिवसैनिक पंकज सुर्वे, विनोद निकम, ज्ञानेश्वर परब, युवती सेनेच्या निकिता खेडेकर, भक्ती पाटकर, प्रज्ञा चव्हाण आदी उपस्थित होते. KK.MS