माजी खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मुंबई, दि. १३ : संजय शिरसाट यांच्यावर औद्योगिक वसाहतीमधील जमिनीवरून आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या तक्रारीवरून माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री लक्ष्मण हिवराळे (46, रा. क्रांतिनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
संजय शिरसाट यांनी पत्नी आणि मुलाच्या नावे शहाजापूरमधील सरकारी १० एकर जमीन फक्त १ कोटी १० लाख रुपयांना खरेदी केली. शेंद्रा एमआयडीसीमध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर सहा कोटी रुपयांची जमीन घेतल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला होता.शिरसाट यांच्या गैरव्यवहारांची माहिती पुराव्यासह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांनी वेळ द्यावा अशी विनंती करणारे पत्र इम्तियाज जलील यांनी पाठविले आहे. दरम्यान शिरसाट यांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रे जलील यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना (ambadas danve) दिली आहेत.
शिरसाट यांच्यावर आरोप करताना एका समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लक्ष्मण हिवराळे यांनीपोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून जलील यांच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Atrocity case registered against former MP Imtiaz Jalil
SL/ML/SL