कामगार नेते गजानन नागे यांनी घेतली कामगार मंत्र्यांची घेतली भेट

मुंबई, दि 4
कामगार नेते आणि भाजपा बेस्ट कामगार संघाचे सरचिटणीस गजानन नागे यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भाजपा प्रदेश कार्यालयातील जनता दरबार येथे भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी बेस्ट कामगारांच्या विविध समस्या कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे मांडल्या. यामध्ये कामगारांना 2016- 2021 या काळातील फरक त्वरित देण्यात यावा. कामगारांना कोविड भत्ता आणि
कामगारांना सेवाजेष्टतेनुसार पदोन्नती देण्यात यावी. करारानुसार बस ताफा ३,३३७ करणे. तसेच कायम स्वरूपी कामगार भरती करावी.
बेस्ट उपक्रम महानगरपालिकेत विलीनीकरण करावे. तसेच
बेस्ट आगारातील उपहार गृह सुस्थितीत करावे.
उपक्रमातील खाजगी करणाने झालेले तोटे यावर तोडगा काढावा.
सन २०२१ ते २०२६ चा वेतन करार त्वरित करावा यासारख्या इतर मागण्या त्यांनी यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे मांडल्या. आपल्या सगळ्या समस्या या योग्य असून त्यावर योग्य तरी निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नागे यांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा कामगार संघाचे अध्यक्ष गणेश हाके आणि इतर पदाधिकारी, कामगार बंधू आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.