सह्याद्री फाउंडेशन च्या वतीने 6 जून श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 1 लाख 1 हजार रुपये अर्पण.

मुंबई, दि 3
एक शिवभक्त या नात्याने आपली जबाबदारी समजून राज्याभिषेकासाठी फुल नाही फुलाची पाकळी आज छत्रपती संभाजी महाराजांकडे सोपवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राष्ट्रावर अनंत उपकार केले आहेत. त्यातून आपण उतराई होऊ शकत नाही. याची जाणीव मनात ठेऊन ही राशी दिली. मी म्हणालो राजे रक्कम तशी कमी आहे पण तुमच्या प्रती अन् महाराजांच्या प्रती आमचा भाव मोठा आहे. आपण त्याचा स्वीकार करावा.
महाराजांना थोडेसे गहिवरून आल्याचे मी पाहिले. कारण मी महाराजांचा सहकारी म्हणून काम केले होते. अन् आज स्वतःच्या पायावर उभा राहिलोय. हे बघून त्यांना आनंद झाला असावा.
महाराज म्हणाले, योगेश तुम्ही किती रुपये दिले? हे महत्वाचे नाही. तुम्ही देण्याची मानसिकता ठेवली हे जास्त महत्त्वाचे आहे. माझ्यासोबत तुम्ही काम केला आहे. त्यामुळे तुम्हाला मी कसा आहे हे इतरांच्या पेक्षा जास्त माहिती आहे. तुमची ही देणगी माझ्यासाठी विशेष आहे. एकेक रुपया सत्कारणी लागणार याचा विश्वास मला सुद्धा आहेच.
आज 6 जून राज्याभिषेक सोहळा लोकोत्सव झाला आहे. लाखो शिवभक्त गडावर येत आहेत. परंतु तो सोहळा यशस्वी करण्यासाठी पाठीमागे खूप मोठी यंत्रणा काम करत असते. सोहळ्यावेळी शेकडो शिवभक्त वेवेगळ्या पद्धतीने सेवा करत आहेत. ती यंत्रणा उभी राहावी यापाठीमागे संभाजी महाराजांचा त्याग मोठा आहे. ऐतिहासिक राज्याभिषेक जगभर पोहोचला पाहिजे या ध्येयाने मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांनी अहोरात्र कष्ट केले आहेत
काही वर्षे मी स्वतः महाराजांच्या सोबत राहिलो असल्याने प्रत्यक्ष साक्षीदार आहे. दिल्ली असो की न्यूयॉर्क, राजेंनी जगभरातील लाखो शिवभक्त गडासोबत जोडण्याचा प्रयत्न केलाय. रायगडावर राष्ट्रपती पासून ते विविध देशांच्या राजदूत आणून त्या लोकोत्सव वेगवेगळे कार्यक्रम केले आहेत. आज सोहळा आखीव रेखीव वैभवशाली दिसतोय तो तसा उत्सव करण्यात संभाजीराजे, युवरज्ञी राजे तसेच शहाजीराजे यांनी मोठे परिश्रम केले आहेत.
आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले. आज चेक देताना माझे मित्र काकासाहेब लोमटे उपस्थित होते.