समाजसेवक एकनाथ ठाकूर यांचा वाढदिवस धर्मशाळेत साजरा

मुंबई, दि 2
सेंट जॉर्ज येथील संत गाडगे बाबा धर्मशाळेत समाज भूषण रुग्ण सेवक शीतल , शालीन तसेच विदर्भाचे महान सुपुत्र ज्यांना त्यांच्या लहानपणी संत गाडगेबाबांच्या मांडीवर खेळण्याचे भाग्य प्राप्त झाले व पुढे त्याच प्रेरणेतून महसूल खात्यात चालून आलेली चांगली नोकरी सोडून आपले उभे आयुष्य रंजले गांजलेले, दीनदलीत व रग्णसेवेत वाहून घेणाऱ्या तपस्वी व्यक्तीमत्व मा. एकनाथभाऊ ठाकूर यांचा स्वयंस्फूर्तीने ७१ वा वाढदिवस संत गाडगेबाबा धर्मशाळा, सेंट जार्ज हॉस्पीटल येथे मान्यवरांच्या व रुग्ण सेवा समाज सेवेला वाहून घेतलेल्या त्यांच्या कुटुंबीयांच्या व धर्मशाळेत मुक्कामी रुग्ण व त्यांच्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत पार पडला. भाऊंची व त्यांच्या कुटुंबीयांची रग्णसेवेशी जुळलेली नाड केवळ यामुळेच हा सोहळा एखाद्या हॉटेल किंवा बैंक्वेट हॉल मध्ये संपन्न होण्याऐवजी धर्मशाळेत संपन्न होऊन आपल्या आनंदात दुः खी कष्टी रुग्णांना सामावून घेत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान फुलवले. विदर्भ वैभव मंदिराचे सरचिटणीस व विदर्भ समाज संघ चे संस्थापक गजानन भाऊ नागे, विदर्भ सेवासंघ ठाणे मुंबई चे अध्यक्ष भुयार राजेंद्र हटवार आदिवासींकरिता शाळा चालवणारे डॉ. प्रकाश फुटणे सेवक प्रकाश डॉ. कापसे, सर, समाज पाटकर, संत गाडगे बाबा विचाचे मंच प्रतिष्ठान कामोठे शहर नवी मुंबई खजिनदार अनिल कुमरे पद्मावती सामाजिक संस्थेचे प्रमुख शाह साहेब परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वच वक्त्यांनी सत्कार मूर्ती एकनाथ भाऊ ठाकूर यांच्या जीवन कार्याचा परिचय उपस्थित जन समुदायास
दिला. सत्कार मूर्ती एकनाथ भाऊ यांनी संत गाडगे बाबा यांच्या कार्यान, सेवेने मानवी जीवन कसे आकार घेते व जीवनात कसा रंग भरतो हे सांगताना त्यांनी बरेच रोमहर्ष जीवनातील प्रसंग सांगितले. संत गाडगे बाबा धर्मशाळा दादर चे महा व्यवस्थापक प्रशांत दादा देशमुख, दैनिक पुण्य प्रताप चे मुख्य संपादक विवेकानंद पाटील, समाज सेविका अरुणाताई गावंडे व अनिलकुमार गयाबाई गुलाबराव मेश्राम यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून भाऊंच्या कार्याचा गुणगौरव केला सेंटजॉर्ज धर्मशाळेचे व्यवस्थापक अमोल दादा ठाकूर यांनी सुंदर आयोजन करून कार्यक्रम यशस्वी पने साजरा केला. सर्वांचे आभार मानणे. संत गाडगे बाबा यांचे पसायदान व महाप्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.