डॉकयार्ड रोड येथे पिण्याचे पाण्याची टंचाई
मुंबई, दि 2
डोक्याजवळ येथील माजगाव आणि नवानगर आसपासचे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर दोन दोन तीन दिवसांनी पाणी येत असून त्यामुळे येथील रहिवासी फार त्रस्त झाले आहेत. याबाबत त्यांनी महापालिका प्रशासनाकडे तसेच स्थानिक आमदार मनोज जामसूतकर यांच्याकडे नियमित पाणीपुरवठा व यासाठी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने भायखळा विधानसभेचे स्थानिक आमदार मनोज जामसुतकर यांनी नवानगर डॉकयार्ड रोड आणि आसपासच्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे काहीसे प्रमाणामध्ये येथील स्थानिक नागरिकांची पिण्याचे पाण्याची गैरसोय थांबली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी जामसुतकर यांना मनापासून धन्यवाद दिले. गेल्या अनेक दिवसांपासून नवानगर डोक्या रोड माज वगैरे काही पिण्याचे पाण्याची समस्या निर्माण झाली होती याबाबत आम्ही महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. लवकर देतील सुरू असलेले काम संपुष्टात येईल आणि येथील नागरिकांचे पिण्याचे पाण्याची टंचाई दूर होईल. आम्ही तात्पुरता स्वरूपात पिण्याचे टँकरची व्यवस्था उपलब्ध करून दिली असून नागरिक यांच्या मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे अशी माहिती स्थानिक आमदार मनोज जामसुतकर यांनी दिली.