मे महिन्यात बाजारात 1.5% वाढ, गुंतवणूकदारांच्या नजरा आता RBI च्या पतधोरण निर्णयावर

जितेश सावंत
Markets Gain 1.5% in May; Investors Eye RBI Policy Decision Closely
भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या आठवड्यात घसरणीने बंद झाला. यामागे अमेरिकेच्या न्यायालयाने ट्रम्प काळातील व्यापक टॅरिफ (कर) पुन्हा लागू करण्याचा घेतलेला निर्णय हे मुख्य कारण ठरले. अमेरिका–चीन व्यापार चर्चांमधील अनिश्चितता, अमेरिकी बाँड यिल्ड आणि डॉलरमधील अस्थिरतेमुळे जागतिक बाजारपेठांमध्येही चढ–उतार पाहायला मिळाले.
तरीही, भारतीय निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० ने सलग तिसऱ्या महिन्यात वाढ नोंदवली. मे महिन्यात परकीय गुंतवणूकदारांनी (FPI) भारतीय शेअर्समध्ये सुमारे $2.6 अब्ज इतकी गुंतवणूक केली (सप्टेंबर 2024 नंतर सर्वाधिक)
The Indian stock market closed lower for the second consecutive week, primarily due to the US court’s reinstatement of Trump-era tariffs, sparking global volatility. However, both Sensex and Nifty 50 recorded their third straight monthly gain in May, supported by strong FPI inflows totaling $2.6 billion the highest since September 2024.
Despite early-month tensions with Pakistan and mixed global cues, domestic indicators like RBI’s record dividend and better monsoon forecasts provided some support
निफ्टी५०ने मे महिन्यात 1.7% वाढ घेऊन 24,750.70 वर बंद दिला.(मे महिन्याच्या सुरुवातीला भारत-पाकिस्तान तणावाच्या वाढीमुळे बाजारावर नकारात्मक परिणाम झाला होता.).
बीएसई सेन्सेक्स 1.5% वाढून 81,451.01 वर पोहोचला.
मार्चपासून दोन्ही निर्देशांक सुमारे 12% वाढले आहेत, तरीही ते सप्टेंबर 2024 मधील विक्रमी उच्चांकाच्या सुमारे 6% खाली आहेत.स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकात अनुक्रमे 8.7% आणि 6.1% इतकी जोरदार वाढ झाली आहे.
Nifty 50 rose 1.7% to 24,750.70, and Sensex gained 1.5% to 81,451.01. Mid- and small-cap indices outperformed, surging 6.1% and 8.7%, respectively. GDP growth for FY25 slowed to 6.5% a four-year low but Q4 saw a sharp rebound at 7.4%.
रिझर्व्ह बँकेकडून विक्रमी लाभांश आणि समाधानकारक मान्सूनची शक्यता असे सकारात्मक संकेत मिळत असतानाही गुंतवणूकदार सतर्क राहिले. आणि आठवडाभर बाजारात मोठी चढ–उतार पाहायला मिळाली.
गुंतवणूकदार आता रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरण निर्णयाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा GDP वाढीचा वेग 6.5% इतका नोंदवला गेला, जो मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे.कोरोना साथीनंतरच्या चार वर्षातील निच्चांक.
मात्र, FY25 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत GDP ग्रोथ 7.4% झाली.
येणार आठवडा हा गुंतवणूकदारांकरिता महत्वपूर्ण राहणार आहे .
महत्त्वाचे ट्रिगर –
(Triggers)RBI MPC बैठक शुक्रवार,6 जून 2025,ऑटोविक्रीडेटा(मे महिना), परकीय गुंतवणूक (FII Inflows),महागाई, उद्योग उत्पादन आकडेवारी,अमेरिका-चीन व्यापार तणाव, तसेच भारताच्या शेजारील राजकीय हालचाली, काही IPO ची शेअर बाजारात होणारी लिस्टिंग आणि खास करून GDP आकडेवारीचा परिणाम.
Looking ahead, markets await key triggers: the RBI MPC meeting on June 6, monthly auto sales, FII trends, macro data (inflation & IIP), and geopolitical developments. Also, new SME IPO listings will keep investor sentiment active.
Technical Analysis of Nifty :
Closing on Friday: Nifty closed at 24750.7
KeySupportLevels:24730,24690,24630,24544,24522,24481,24461,24419and24000.Breakingthese could lead Nifty to further lower levels.
ResistanceLevels:, 24837,24872,24895,24923,2498324919,25000,25128,25170and25223.Theseresistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant