कृषीमंत्री म्हणतात, कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी

 कृषीमंत्री म्हणतात, कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी

पुणे, दि. ३१ : राज्यभरातील शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झालेले असताना त्यांना मदतीचा हात देण्या ऐवजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे बेताव विधाने करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या प्रचंड नुकसानीनंतर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहतोय. नुकत्याच सिन्नर दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त शेती पाहताना “ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले होते. या विधानावरून राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. “या मंत्र्याचं डोकं ठिकाणावर आहे का? असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करत सरकारलाच इशारा दिला आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, जर कोकाटेंना लगाम घातला नाही, तर काँग्रेस आणि शेतकरीच त्यांना योग्य तो धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी दिला. एकडे सपकाळांनी हा इशारा देण्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना ते म्हणाले की, कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी आहे, ती अजितदादांनी मला दिली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *