वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील फरार सह आरोपी जेरबंद

 वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील फरार सह आरोपी जेरबंद

पुणे, दि. 30 : राज्यभर चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील फरार सह आरोपी नीलेश चव्हाण याला तब्बल दहा दिवसांनी पोलिसांनी नेपाळमधून अटक केली आहे.यामुळे या प्रकरणात तपासाला वेग येणार आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रकरणात पीडित कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्या प्रकरणी नीलेश चव्हाण या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप आहे. तसेच त्याने त्याच्या पत्नीचा अमानुष छळ व तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. त्याला आता नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. त्याला आज रात्रीपर्यंत पुण्यात आणले जाणार आहे.

नीलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेचे पती शशांक हगवणे आणि बहिण करिष्मा हगवणे यांचा मित्र आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर त्याच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा ठपका आहे. तो स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित करायचा. या प्रकरणी त्याच्यावर 2019 मध्ये पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच ठाण्यात नीलेश चव्हाणवर वैष्णवी हगवणेचे बाळ मागण्यासाठी गेलेल्या तिच्या माहेरच्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *