सागरी सुरक्षेसाठी नौदल खरेदी करणार ४४ हजार कोटीची यंत्रणा
नवी दिल्ली, दि. २८ : समुद्री सुरुंग नष्ट करणाऱ्या 12 स्वदेशी माईन काऊंटर मेजर वेसल्स (MCMV) लवकरच नौदलाच्या ताफ्यात येणार आहेत. ४४, ००० कोटी रुपयांच्या खर्चातून या माईन काऊंटर वेसल्स खरेदी केल्या जाणार आहेत. या वेसल्स आता समुद्रात शत्रूने पेरलेले सुरुंग शोधून त्यांना नष्ट करण्याचे काम या नौका बजावणार आहेत. या महत्वाकाक्षी योजनेला संरक्षण मंत्री मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील डिन्फेस एक्विजिशन काऊंसिलला (DAC) लवकरच मंजूरी देणार आहे.
MCMV म्हणजे Mine Counter Measure Vessel एक खास प्रकारची नौदलाची नौका आहे, जी समुद्राच्या खाली पेरलेले सुरुंग शोधून काढून त्यांना नष्ट देखील करते. यामुळे भारताच्या समुद्र सीमातर सुरक्षित होतीलच शिवाय अटीतटीच्या प्रसंगी नौदलाच्या युद्धनौकांचा मार्ग निर्धोक करण्याची जबाबदारी 12 MCMVवर असणार आहे.