जालनाच्या भोकरदन तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी….

जालना दि २५– पावसाचा जोर अधिक असल्याने सोयगाव देवी येथे नदीला आला पूर, सोयगावदेवी येथे पुलावरून पावसाचे पाणी वाहत असल्याचे दिसून येत आहे.
जालनाच्या भोकरदन तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावलीय. भोकरदन तालुक्यातील सोयगावदेवी, बेलोरा आणि वालसा गावात मुसळधार पाऊस झालाय. पावसाचा जोर अधिक असल्याने सोयगावदेवी येथे नदीला पूर आला आहे. आणि हे पाणी आता पुलाच्या वरून वाहत आहे. जालना जिल्ह्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार जालन्याच्या भोकरदन तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे भोकरदन तालुक्यातील सोयगावदेवी येथून वाहणाऱ्या नदीला पूर आला आहे. त्यामुळे या नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळे पुलावरून होणारी वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून नागरिकांना पुलावरून येजा करण्यास अडचण होत आहे.
ML.MS