अवकाळीचा कांदा, कोथिंबीर आणि टरबूज पिकाला तडाखा…

लातूर दि २४:– लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसाचा फळबागांना आणि पालेभाज्यांना तडाखा बसलाय. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकर शेतातील टरबूज पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच शिरुर अनंतपाळ येथील एका शेतकऱ्याच्या तीन एकरातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील रामवाडी येथील एका शेतकऱ्याच्या साडेचार एकरातील कोथिंबीरीला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय.. अवकाळीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केलीय.