शुभमन गिल भारताचा नवा कसोटी क्रिकेट कर्णधार

मुंबई, दि. २४ : भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी युवा सलामीवीर शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली आहे. BCCI निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.
आगरकर यांनी शुबमन गिल याचं कर्णधार म्हणून नाव जाहीर केलं. सोबतच इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणाही केली. इंग्लंड दौऱ्यासाठी 18 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. विकेटकीपर ऋषभ पंत याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.