चिंचपोकळी आर्थर रोड येथील मंदीर तोडण्याबाबत लोकांमध्ये जन आक्रोश

मुंबई प्रतिनिधी
आर्थर रोड नाका येथील बीएमसी कर्मचारी निवासस्थान परिसरात असलेल्या शंभर वर्षे जुन्या श्री.लक्ष्मीनारायण मंदिर समितीला बीएमसी व बिल्डरमार्फत नोटीस देण्यात आली होती. या नोटिसीमुळे स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले होते. मंदिर तोडण्यासाठी पुढे सरसावलेल्या महापालिका आणि बिल्डरची दादागिरी आम्ही सहन करणार नाही. मंदिराची जागा वाचवण्यासाठी आम्ही समितीच्या सदैव सोबत आहोत! या विषयाच्या संदर्भात आमदार आदित्य ठाकरेn यांच्या मार्गदर्शनानुसार माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज उप आयुक्त (घ.क.व्य.) श्री.किरण दिघावकर यांची महापालिका मुख्यालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून महापालिका प्रशासन आमच्या सोबत आहे. तसेच बिल्डरचे दादागिरी आम्ही सहन करणार नाही त्यासाठी वाटेल ते करायला आम्ही तयार आहोत अशी माहिती माझे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. या बैठकीला माजी नगरसेवक सुनील अहिर , शाखाप्रमुख गोपाळ खाडे, उपशाखाप्रमुख राजेश बतवार तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते.