मुंबईकर खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली भारताचा U-19 संघ जाहीर

 मुंबईकर खेळाडूच्या नेतृत्त्वाखाली भारताचा U-19 संघ जाहीर

मुंबई, दि. २२ : भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ लवकरच इंग्लंडचा दौरा करणार आहे. यासाठी BCCI ने संघ जाहीर केला आहे. IPL 2025 मध्ये CSKकडून खेळलेल्या आयुष म्हात्रेकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये 35 चेंडूत शतक झळकावणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आले आहे.

गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात बीसीसीआयने म्हटले आहे की, “ज्युनियर क्रिकेट समितीने 24 जुन ते 23 जुलै 2025 या कालावधीत होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 19 वर्षांखालील संघाची निवड केली आहे. या दौऱ्यात 50 षटकांचा सराव सामना, त्यानंतर पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध दोन बहुदिवसीय सामने खेळण्याचा समावेश आहे.

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आर एस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल मोहम्मद पटेल, युवराज पटेल, प्रदीपन आदित्य राणा, अनमोलजीत सिंग

mmcnews mmcnews

Related post