अवकाळी पावसामुळे नदीला आला पूर…

जालना दि २२– अवकाळी पावसामुळे जालन्याच्या हसणाबाद येथील गिरजा नदीला पूर आला आहे. भोकरदन तालुक्यातील हसणाबाद येथील गणेशनगर, खडकी, बोरगाव, खडक सिवरसगाव यासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी झाली. गिरजा नदीला पूर आल्याने गिरजा नदीकाठच्या गावांची पाण्याची समस्या झाली दूर झाली आहे.
अवकाळी पावसामुळे जालन्याच्या हसणाबाद येथील गिरजा नदीला पूर आलाय. भोकरदन तालुक्यातील हसणाबाद येथील गणेशनगर, खडकी, बोरगाव, खडक सिवरसगाव यासह परिसरात काल जोरदार पावसाने हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे हसनाबाद येथील गिरजा नदीला पूर आला असून नदी काठोकाठ भरून वाहत आहे. दरम्यान, मे महिन्यातच गिरजा नदीला पूर आल्याने गिरजा नदीकाठच्या गावांची पाण्याची समस्या दूर झालीय. शिवाय शेती पिकांसाठी ही पाण्याची सोय झाल्याने शेतकरी आनंदित आहेत.