NCERT ची 2.5 कोटींची पायरेटेड पुस्तके जप्त

नवी दिल्ली, दि. २० : दिल्ली पोलिसांनी काल एनसीईआरटी चा १.७ लाखांहून अधिक पायरसी केलेली पाठ्यपुस्तके जप्त केली. त्याची किंमत २.४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे, ज्यात एका पिता-पुत्राचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख प्रशांत गुप्ता (४८) आणि त्यांचा मुलगा निशांत गुप्ता (२६) आणि अरविंद कुमार अशी आहे.
शाहदरा डीसीपी प्रशांत गौतम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘प्रशांत आणि निशांत यांचे एक दुकान होते, जिथे पोलिसांना मोठ्या प्रमाणात पायरेटेड शैक्षणिक पुस्तके सापडली. ही पुस्तके खऱ्या NCERT चाचणी पुस्तकांप्रमाणे विकली जात होती. १६ मे रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले.
डीसीपी म्हणाले, ‘दुकानातून बारावीच्या एकूण २७ पायरेटेड सामाजिक शास्त्राची पुस्तके जप्त करण्यात आली. पुस्तकांवर बनावट एनसीईआरटी लोगो आणि बनावट स्वाक्षऱ्या होत्या. एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी जागेवर पडताळणी केल्यानंतर, ही सामग्री बनावट आणि कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याची पुष्टी केली.