मुंबईत कोरोनाचा शिरकाव, आढळले ८ बाधित रुग्ण
 
					
    मुंबई,दि. १९ : सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत होतो. आता मुंबईतही कोरोनाने प्रवेश केला आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात या रुग्णांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या रुग्णांना वेगवेगळ्या आजारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये काल दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांना कोविड-१९ ची लागण असल्याचे मृत्यूनंतर स्पष्ट झाले.
मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये मागील दोन महिन्यांत १५ कोविड-१९ रुग्ण आढळले होते, परंतु सर्व रुग्ण संपूर्णपणे बरे झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आरोग्य विभागाने सांगितले की कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे, आणि बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणांसह बरे होत आहेत. केवळ सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी कोविड-१९ गंभीर ठरू शकतो, परंतु असे प्रकरणे आता दुर्मिळ होत आहेत. सार्वजनिक घबराटीची गरज नाही, परंतु सतर्कता आणि प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक आहेत
मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची शिफारस केली आहे, तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोविड-१९ आता स्थानिक स्वरूपात अस्तित्वात आहे, आणि त्याची तीव्रता पूर्वीइतकी गंभीर नाही, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
 
                             
                                     
                                    