भारताने केला कच्च्या तेलाच्या आयातीचा विक्रम

भारताने मार्च २०२५ मध्ये दररोज ५४ लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केला आहे. २०२५ आणि २०२६ मध्ये भारतातील कच्च्या तेलाची मागणी सर्वात वेगाने वाढण्याची अपेक्षा असून ही मागणी चीनच्या मागणीच्या दुप्पट असेल, असे ओपेकने म्हटल असून वाढत्या ऊर्जेच्या गरजांमुळे ही मागणी वाढत आहे. मागणीतील ही वाढ २०२५ मध्ये चीनच्या तेलमागणीतील १.५ टक्के आणि २०२६ मध्ये १.२५ टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे, असे ‘ओपेक’ने म्हटलंय…. भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान भारत सरकारने इंधनाच्या बाबतीत कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यालाही याच आयात केलेल्या तेलाच्या विक्रमी साठ्याचा संदर्भ असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे.