‘ऑपरेशन सिंदूर’मागील भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षिय खासदार जाणार परदेशांत
 
					
    नवी दिल्ली, दि. १६ : ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार सर्व पक्षांच्या खासदारांना परदेशात पाठवणार आहे . २२ मे पासून ५-६ खासदारांचे ८ गट १० दिवसांसाठी ५ देशांना भेट देतील. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहिती तेथील सरकार आणि सामान्य लोकांना देतील. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू खासदारांच्या परदेश दौऱ्यांचे सूत्रसंचालन करत आहेत. शिष्टमंडळात सामील होण्यासाठी खासदारांना आमंत्रणे पाठविण्यात आली आहेत. खासदारांना त्यांचे पासपोर्ट आणि आवश्यक प्रवास कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वेगवेगळ्या पक्षांचे वरिष्ठ खासदार परदेश दौऱ्यांवर गटांचे नेतृत्व करतील. काँग्रेस खासदार शशी थरूर यांना एका गटाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनाही या शिष्टमंडळात सामील केले जाण्याची शक्यता आहे.
खासदारांसोबत परराष्ट्र मंत्रालयाचा (MEA) एक अधिकारी आणि एक सरकारी प्रतिनिधी देखील असतील असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. हे शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार आणि युएई येथे जातील आणि तेथे पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावावर आणि दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट करतील.
.
 
                             
                                     
                                    