ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रथमच आढळली उडणारी खार

 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रथमच आढळली उडणारी खार

चंद्रपूर दि १५– जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशात १७६ मचाणांवरून वन्यप्राणी गणना करण्यात आली. यावेळी कोळसा रेंजमध्ये प्रथमच उडणारी खार आढळून आली. यामुळे वन्यजीवप्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विविध पशु-पक्ष्यांसह प्रथमच उडणारी खार आढळून आली. या खारीचे शरीर सडपातळ आणि पाय लांब असतात. काही जातींमध्ये शेपटी वरून खाली चपटी झालेली असते. आजपर्यंतच्या पशुगणनेत प्रथमतच या खारीची नोंद झाली आहे.

दरम्यान, प्राणी गणनेत कोणते प्राणी कितीच्या संख्येने आढळले, याची आकडेवारी वनविभागाने जाहीर केली. यात 5502 वन्यजीव-पक्ष्यांची नोंद झाली. यात 63 वाघ, 13 बिबटे आणि 93 अस्वलींचा समावेश आहे. याशिवाय रानकुत्रे, मुंगूस, रानमांजर, चौशिंगा, सांबर, चितळ, निलगायी, मगर, सायाळ, भेडकी आणि विविध पक्ष्यांचे दर्शन झाले. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत १७६ मचाणींवरून विविध ठिकाणांवरून आलेल्या २४५ पर्यटकांसह १८३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही गणना केली. यासाठी ताडोबातील बफर क्षेत्रात ८१ व कोअर क्षेत्रामध्ये ९५ मचाणी उभारण्यात आल्या होत्या.

ML.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *