गोल्डन बॉय नीरज चोप्रा झाला लेफ्टनंट कर्नल

नवी दिल्ली, दि. १४ :
गोल्डन बॉय ऑलिंपिक विजेता नीरज चोप्रा आता भारतीय सैन्य दलाचा भाग होणार आहे. नीरज चोप्राला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल पदाचा बहुमान देण्यात आला आहे. नीरज चोप्राने भाला फेंक प्रकारात उत्तुंग कामगिरी करत जगभरात तिरंगा फडकवला होता. आता, त्याला सैन्य दलाची वर्दी मिळणार आहे.
भारतीय टेरिटोरियल आर्मी रेग्युलेशन 1948 च्या Para-31 नुसार नीरज चोप्रा ला भारतीय सैन्य दलात सहभागी करुन घेण्यात आलं आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती देण्यात आली आहे. यापू्र्वी नीरज चोप्रा राजपूताना रायफल्समध्ये सुभेदार पदावर कार्यरत होता. सन 2016 साली तो नायब सुभेदार पदावर भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. आता, त्याला बढती मिळाली असून थेट लेफ्टनंट कर्नल झाला आहे.
दरम्यान भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम बंद केली असून तात्पुरती स्थगित केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना स्पष्ट केले. दरम्यान, सैन्य दलाच्या कामगिरील पंतप्रधान नरेंद मोदींसह देशाच्या 140 कोटी नागरिकांनी सॅल्यूट केला आहे.