राज्यातील सरकारी रुग्णालयातील रुग्णवाहिका ठप्प होणार

मुंबई, दि 14
राज्यातील सरकारी रुग्णालये अत्याधुनिक करत गोरगरीब जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी सरकार पावले टाकत आहे. मात्र या रुग्णालयातील कंत्राटी कामगार व १०८ रुग्णवाहिका चालक समान काम समान वेतन ही मागणी घेऊन आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. सेवा सुरू ठेवत प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारने जर गांभीर्याने विचार करत आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आंदोलन तीव्र व त्यानंतर बेमुदत केले जाईल असा इशारा या कामगारांचे नेते कॉम्रेड डी एल कराड यांनी दिला आहे. गल्लीपासून दिल्ली पर्यंत तसेच राष्ट्रपती भवन या सर्व ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर कामगार ठेवणारे कंत्राटदार बी व्ही जी ग्रुप चे सर्व्हे सव्र्व्ह हणमंतराव गायकवाड यांच्या कंपनीचे हे १०८ रुग्णवाहिकेचे चालक या आंदोलनात सामील झाल्याने या गोरगरिबांच्या रुग्णवाहिका ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायालयाचे आदेश जर हे कंत्राटदार मान्य करत नसतील तर सरकार त्यांना पाठीशी का घालत आहे. असा सवाल कराड यांनी केला आहे.
किमान वेतन आता आम्हाला नको. तर आता आम्हाला समान काम समान वेतन या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे. असे सांगत कराड म्हणाले, सि टू हि लाल बावटा संघटना ४०० रुपये पगार असणाऱ्या कामगारांना जर ८० हजार पगार करू शकते तर तुम्हाला समान काम समान वेतन देण्यासाठी जिवाचे रान करेल. देशातील चांगले वकील देऊन या कामगारांना न्याय देणार. फक्त कामगारांनी संघटनेची पावती फाडून मोकळे न होता सैन्यातील सैनिकासारखे आक्रमक झाले तर आम्हालाही नेतृत्व करण्यास बळ मिळते. त्यामुळे आता थांबायचे नाही लाल बावटा झें ड्यखाली मोठ्या संख्येने आक्रमक होणार.
KK.MS