अंदमानात मान्सूनचे आगमन

अंदमानात मान्सून दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. निकोबार बेटांवर मागील 24 तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
6 जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मॉन्सून 6 जून आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस होताना दिसतोय तसेच येत्या 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.