राज्यातील आरोग्य मित्रांच्या समस्या सोडवण्या साठी सिटू करणार १३ मे रोजी आंदोलन…

 राज्यातील आरोग्य मित्रांच्या समस्या सोडवण्या साठी सिटू करणार १३ मे रोजी आंदोलन…

मुंबई, दि. 12
राज्यातील आरोग्य मित्र व 108 ॲम्बुलन्स चालकांच्या समस्या व मागण्यांबाबत संबंधित व्यवस्थापन यांना वेळोवेळी पत्राद्वारे समस्या मांडून त्याचबरोबर आरोग्यमंत्र्यांना देखील निवेदने दिलेली आहेत तरीसुद्धा त्यांच्या समस्या अद्याप देखील सुटलेल्या नाही. दुर्दैवाने आरोग्यमंत्र्यांकडे देखील चर्चेसाठी अद्याप वेळ मिळालेली नाही तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत व त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय सुरूच आहे.
आरोग्य मित्र व १०८ वाहन चालकांचे प्रश्न गंभीर आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा पुरवण्यासाठी काम करत आहेत. त्यांना अत्यल्प वेतन मिळते तसेच त्यांच्यावर एजन्सीच्या मार्फत विविध प्रकारे अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मित्र कर्मचारी व 108 ॲम्बुलन्स चालक यांच्यावतीने 13 मे 2025 रोजी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात संघटनेतर्फे पुढील मागण्या सादर करण्यात येत आहे.
आरोग्य मित्रांना संपा दरम्यान खात्यावर किमान 16000/– रुपये इतके वेतन मिळेल असे सांगण्यात आले तरी अद्याप देखील ते आरोग्य मित्रांना मिळाले नाही ते अदा करण्यात यावे, आरोग्य मित्रांनी आपला राज्यघटनेने दिलेला संविधानिक अधिकार बजावला आणि संघटना केली म्हणून कामावरून कमी केले जात आहे हा प्रकार धक्कादायक असून तो बंद व्हावा व कमी केलेल्या आरोग्य मित्रांना पुन्हा कामावर रुजू करण्याचे आदेश करण्यात यावे, आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाटेल ते आणि छोट्या-मोठ्या कारणांवरून show cause नोटीस वेगवेगळ्या जिल्ह्यात देण्यात आले आहे. हा प्रकार तात्काळ थांबवून या सर्व कारवाया मागे घेण्यात याव्या, “noticed declaration on plane paper” या शीर्षकाखाली आरोग्य मित्रांकडून फॉर्म भरून घेण्यासाठी दबाव आणला जात आहे ही बाब देखील बेकायदेशीर आणि कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे त्यामुळे ही कारवाई देखील तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात यावे, तसेच आरोग्य मित्रांना दरमहा 26000/–वेतन व किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलाउन्स तथा महागाई भत्ता द्यावा, वेतनात दरवर्षी १०% वाढ करण्यात यावी, आरोग्यमित्रांना पेट्रोल अलाउंस देण्यात यावा, तसेच sick leave, casual leave,privilege leave, लागू करण्यात याव्या, ESIC मधील त्रुटी दूर करून सर्व आरोग्य मित्रांना एस.आय.सी.कार्ड देण्यात यावे इत्यादी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे 108 ॲम्बुलन्स कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम असलेल्या वाहनचालकांप्रमाणे समान कामास , समान वेतन या तत्वावर वेतन व भत्ते अदा करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाने 14 ऑक्टोबर 2024 रोजी अधिसूचनेद्वारे जाहीर केलेल्या सार्वजनिक मोटार वाहन वाहतूक उद्योगाचे कुशल दर्जाचे आठ तासांसाठी चे वेतन 108 रुग्णवाहिका वाहन चालकांना अदा करण्यात यावे, मोटर वाहतूक कामगार अधिनियम 1961 नुसार ८ तासांपेक्षा जादा कामाचा मोबदला सामान्य आठ तासाच्या वेतनाच्या दुप्पट दराने ठेवण्यात यावा, कायद्याने लागू असलेल्या सर्व प्रकारच्या रजा नियमित देण्यात याव्यात किंवा त्यानुसार रजेचे वेतन अदा करण्यात यावे, ज्या वाहनचालकांना ईएसआयसी सुविधेचा लाभ मिळत नसेल त्यांना कॅशलेस आरोग्य विमा लागू करण्यात यावा, वार्षिक 8.33% बोनस अदा करण्यात यावा, रुग्णवाहिका धुलाई भत्ता, १० तारखेच्या आत वेतन मिळावे, पाच वर्षे पूर्ण झालेल्या वाहन चालकांना ग्रॅज्युटी देण्यात यावी, food allowance, इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी आरोग्य मित्र व 108 ॲम्बुलन्स वाहन चालक कर्मचारी सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिटू) च्या नेतृत्वाखाली दिनांक 13 मे 2025 रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व सिटू चे राज्य अध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल.कराड यांच्या मार्गदर्शनाखाली, आरोग्य मित्र सरचिटणीस किरण ढमढेरे, गणेश शिंदे, तुकाराम सोनजे, राहुल गायकवाड, त्याच बरोबर १०८ रुग्णवाहिका पदाधिकारी नागेश नरळे, पांडुरंग ठोमके, संदीप पष्टे आणि इतर पदाधिकारी करणार आहे.
KK/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *