राज्याच्या या भागात पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट बंद

पेट्रोलपंपावर डिजिटल पेमेंट केल्यावर सायबर फ्रॉडचे काही गुन्हे घडले आहेत. याला आळा घालण्यासाठी आता पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पेट्रोल पंप चालक संघटनांनी या बाबत माहिती दिली असून १० मे पासून UPI आणि इतर डिजिटल मेपेंट स्वीकारणे बंद करण्यात येणार आहे. विदर्भ आणि नाशिक विभागात हा निर्णय प्रथम आमलात येणार आहे.