सीमाभाग आणि किनारपट्टीच्या देखरेखीसाठी ISRO चा विशेष उपग्रह

भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) 18 मे रोजी ईओएस-09 (आरआयसैट-1बी) रडार इमेजिंग सॅटेलाइटला सूर्याच्या समकालिक कक्षेत नेणारा पीएसएलव्ही-सी61 मिशन लॉन्च करणार आहे. लॉन्चिंग श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 6.59 वाजता हे प्रक्षेपण होणार आहे. . सीमेवर तणाव वाढत असताना सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह गुप्त माहिती प्रदान करण्याची उपग्रहाची क्षमता भारतीय सुरक्षा दलांसाठी महत्वाची आहे.
EOS-09 अत्याधुनिक सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडारने सुसज्ज आहे. यामुळे विपरीत हवामानाची पर्वा न करता पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन फोटो कॅप्चर करणे शक्य होणार आहे. हा उपग्रह भारताच्या पाकिस्तान आणि चीनसोबतच्या संवेदनशील सीमांवर देखरेख वाढवणार आहे. तसेच सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.