न्यायालयाने केली शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

मुंबई, दि.9
सन २०१७ साली अमरनाथ यात्रेकरुंवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला होता. ह्या हल्ल्याचा तीव्र निषेध म्हणून शिवसेनेतर्फे ठीकठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. नवी मुंबई मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये निषेध आंदोलन केले होते. ह्या आंदोलनामध्ये शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडे जाळून आपला रोष व्यक्त केला होता. यातील श्री विजय माने, श्री दिलीप घोडेकर, सौ रंजना शिंत्रे, श्री समीर बागवान, श्री गणपत शेलार, श्री संतोष मोरे ह्या आंदोलनकर्त्यांवर त्यावेळी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले होते. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय बेलापूर, वाशी न्यायालयात दोषारोप दाखल होऊन सुनावणी घेण्यात आली.
आज दिनांक ९ मे रोजी न्यायालयाने या सर्व शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली.
एकीकडे देशपातळीवर पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांवर भारतीय सेना चोख प्रत्युतर देत असतानाच न्यायालयीन लढाई जिंकणे आनंददायक आणि अभिमानास्पद असल्याची भावना माजी नगरसेवक विजय माने यांनी व्यक्त केली.
KK/MS