भारताच्या हल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडीअम उद्ध्वस्त

नवी दिल्ली, दि. ८ : भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं प्रसिद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं आहे. भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरमसह अनेक ठिकाणचं हवाई संरक्षण रडार आणि प्रणालीला लक्ष्य केलं. तसंच लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय सैन्यानं निष्प्रभ केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय. भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला. या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं असून सध्या त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग 2025 सुरु आहे. या टी 20 लीगचा सामना आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार होता, मात्र भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्धवस्त झाल्याने आज होणारा PSL चा सामान रद्द झाला आहे. PSL मध्ये आज पेशावर झालमी विरुद्ध कराची किंग्स यांच्यात सामना होणार होता. रात्री 8: 30 या सामन्याला सुरुवात होणार होती मात्र आता हा सामना रद्द करण्यात आला आहे.