विष्णू मनोहर यांना मिळाला ‘उत्कृष्ट अमूल्य सेवा’ सन्मान

नागपूर दि ८– आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विक्रमवीर शेफ विष्णू मनोहर यांचा सॅनफ्रान्सिस्को येथे स्टेट ऑफ कॅलिफोर्निया, द काऊंटी ऑफ सॅंटा क्लारा ह्यूमन रिलेशन कमिशन यांच्यातर्फे ‘आउटस्टँडिंग इन्वॅल्युएबल सर्विस’ हे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मागील सहा वर्षांपासून सॅनफ्रान्सिस्को येथे रेस्टॉरंट चालवत असलेल्या विष्णू मनोहर यांनी दिलेल्या सामाजिक योगदानासाठी त्यांना कमिशनचे आयुक्त नरेंद्र पाठक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कोविड काळात, होमलेस कॅम्पमध्ये जेवणाची व्यवस्था करणे, सुमारे 1200 मोफत लंच बॉक्सची 42 दिवस व्यवस्था करणे, प्रार्थना स्थळी प्रसादाची व्यवस्था आदी लोकसेवा, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या त्यांच्या कार्याची दखल घेत द काऊंटी ऑफ सॅंटा क्लारा ह्यूमन रिलेशन कमिशनने त्यांना सन्मानित केले आहे.
ML/MS