‘ श्यामची आई’ मधील ‘श्याम’ हरपला

पुणे, दि. ७ : ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्य समीक्षक माधव वझे यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान कलाकार हरपला आहे. वझे यांनी १९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या राष्टपती पुरस्कार प्राप्त ‘श्यामची आई’ या चित्रपटात श्याम ची भूमिका साकारली होती, ज्यामुळे त्यांनी घराघरात ओळख मिळवली. तसेच २००९ मध्ये आलेल्या ‘३ इडियट्स’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटात त्यांनी जॉय लोबोच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
चित्रपटांव्यतिरिक्त, ते नाट्य दिग्दर्शक तसेच इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी पुण्यातील नौरोजी वाडिया महाविद्यालयात अध्यापन केले होते. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीत शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे मराठी रूपांतर आणि दिग्दर्शनही सामील होते, जे २०१३ मध्ये सादर करण्यात आले होते. माधव वझे हे केवळ एक अभिनेतेच नाही तर विचारवंत आणि समीक्षक देखील होते. त्यांनी नाट्यसृष्टीच्या विकासासाठी तसेच नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी मोठे योगदान दिले
प्रायोगिक रंगभूमी, रंगमुद्रा, श्यामची आई आचार्य अत्रे आणि मी , नंदनवन अशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.