पाकीस्तान विरोधात भारताकडून NOTAM जारी

पहलगामच्या भीषण हल्ल्यानंतर आता भारताने पाकीस्तानचा पुरता बिमोड करण्यासाठी कठोर पावले उटलण्यास सुरुवात केली आहे. उद्या भारताकडून पाकिस्तानी सीमेजवळ हवाई अभ्यास केला जाणार आहे. यासंदर्भातील NOTAM (नोटिस टू एअरमन) जारी करण्यात आलं आहे.
भारत ७ आणि ८ मे रोजी पाकिस्तानी सीमेलगत हवाई अभ्यास करेल. याबद्दलचं नोटिस टू एअरमन केंद्राकडून जारी करण्यात आलेलं आहे. हवाई अभ्यासात भारताचं हवाई दल राजस्थानजवळ शक्तीप्रदर्शन करणार आहे. युद्ध सज्जता तपासून पाहण्यासाठी हवाई दल उद्या सीमावर्ती भागात हवाई अभ्यास करेल. सीमेवरील वाढता तणाव पाहता हा अभ्यास भारताच्या सतर्कतेचा संकेत आहे.
या हवाई अभ्यासात लढाऊ विमानांसह टेहळणी विमानांचादेखील सहभाग असेल. युद्धाच्या परिस्थितीत कारवायांचा सराव हवाई दलाकडून केला जाईल.