छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कॅश तिकीट काउंटर सुरू करा

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कॅश तिकीट काउंटर सुरू करा

मुंबई, दि. ५
सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील बहुतांश तिकीट काउंटर फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे रोख रकमेने तिकीट खरेदीसाठी नागरिकांना मोठ्या अडचणीचा त्रास सहन करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्थानकात रोख रक्कम देऊन तिकीट खरेदी करता येईल यासाठी काउंटर सेवा सुरू करा, अशी मागणी युवासेनेने मध्य रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांकडे केली आहे.
सगळ्या सगळीकडे डिजिटल पद्धतीने तिकिटे काढली जात आहेत. पण सगळेच प्रवाशी डिजिटल पद्धतीने तिकिटे काढण्यासाठी पारंगत नसल्यामुळे त्यांना तातडीच्या प्रवासासाठी तिकीट काढताना विलंब होतो. नाइलाजास्तव काही प्रवाशी वेळेअभावी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे स्थानकातील अर्धे तिकीट काउंटर ऑनलाईन बुकिंगसाठी आणि उर्वरित ‘ रोख तिकीट विक्रीसाठी राखीव ठेवावीत, अशी मागणी युवासेना कुलाबा विधानसभा उपचिटणीस मंगेश आग्रे यांनी मध्य रेल्वेच्या
मुख्य व्यवस्थापकांकडे केली. नुकतीच त्यांनी मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालय अधिकारी अमिषा मॅडम यांची भेट घेतली. तसेच तिकीट खिडक्यांवर स्पष्ट मराठी व हिंदी भाषेत पाट्या लावून फक्त माहिती देण्यासाठी वेगळा काउंटर असावा आणि ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगासाठी वेगळी खिडकी असावी, त्वरित योग्य निर्णय घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
KK/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *