मराठवाडा परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे नुकसान

जालना दि ५:– जालना आणि बदनापूर शहरासह परिसरात गारांचा पाऊस झालाय. यामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात आजपासून पुढील काही दिवस गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार जालना आणि बदनापूर शहरासह परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यावेळी अचानक पाऊस आल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली होती.
दरम्यान, जालन्यात पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. मात्र, गारांचा शेतिपिकांना फटका बसण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.