उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत ग्रंथवाटपाची घोषणा

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत ग्रंथवाटपाची घोषणा

मुंबई ..3 मे
श्रीक्षेत्र आळंदी येथे सुरु असलेल्या संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आज राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री मा. भरत गोगावले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून राज्यभर मोफत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. “घरात बसणाऱ्यांपेक्षा हिंदुत्वाचा विचार घेऊन जनतेत उतरलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यासोबत जाणे हेच योग्य ठरतं. त्यांचं संतविचारांवर निष्ठा आणि वारकऱ्यांप्रती प्रेम आहे,” असेही ते म्हणाले.

राज्य सरकारकडून एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आळंदी पारायण सोहळ्यासाठी २ कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला असून, रायगडसारख्या शिवस्मारकांनाही वारकऱ्यांनी दर्शनासाठी अवश्य भेट द्यावी, असेही आवाहन मंत्री गोगावले यांनी केले. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्रीअक्षय महाराज भोसले पूर्णवेळ समन्व्यक म्हणून आळंदी येथे उपस्थित आहेत.
उद्घाटन सोहळ्यात आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, भगवान पोखरकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *