पर्यावरणासाठी आगळा छंद!
८०० वृक्षांच्या बियांचे संकलन

 पर्यावरणासाठी आगळा छंद!८०० वृक्षांच्या बियांचे संकलन

वाशीम दि ३:– सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. अशा परिस्थितीत वाशीमच्या केवळ ११ वर्षीय शरद नागुलकरने पर्यावरण संरक्षणाचा अनोखा छंद जोपासला आहे. एसएमसी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता ५ वीत शिकणाऱ्या शरदने तब्बल ८०० दुर्मिळ वृक्षांच्या बियांचे संकलन करून समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.
शाळेत राबविण्यात येणाऱ्या ‘हरित सेना’ उपक्रमातून प्रेरणा घेत त्याने विदर्भातील शहरी, ग्रामीण आणि जंगल परिसरातून या बिया संकलित केल्या आहेत.

महत्त्वाचे म्हणजे त्याने संकलित केलेल्या बियांचे विविध संच तयार केले असून त्यातील काही संच सामाजिक वनीकरण विभागाला लागवडीसाठी दिले जाणार आहेत . तर उर्वरित शाळेच्या बॉटनिकल गार्डनसाठी वापरण्यात येणार आहेत.
शरदच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून लहान वयात पर्यावरण संवर्धनाचा दिलेला हा संदेश खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *