देशातील पहिले ‘वॉटर लिटरसी सेंटर’ संभाजीनगरमध्ये

 देशातील पहिले ‘वॉटर लिटरसी सेंटर’ संभाजीनगरमध्ये

छ. संभाजी नगर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इकोनिड्स फाऊंडेशनने भारतातील पहिले ‘वॉटर लिटरसी सेंटर’ छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात आले आहे. याचा उद्देश जलसंधारणाच्या प्रभावी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवणे आहे. पाझर तलाव, कंटिन्युअस कटऑफ ट्रेंचेस (CCT), गॅबियन बांधकामे आणि गली प्लंबिंग यासारख्या पद्धतींचा वापर करून केंद्राने वार्षिक ७८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली असून भूजल स्तर वाढवला व जमिनीची धूप रोखली आहे. एसआरपीएफ अधिकाऱ्यांचे सहकार्य आणि श्रमदानाने हा उपक्रम साकारला असून वृक्षारोपण प्रकल्प व भविष्यात ग्रंथालय व थिएटर सुरू करण्याची योजना आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते २ मे रोजी केंद्राचे उद्घाटन होणार असून त्यांच्या ७१व्या वाढदिवसानिमित्त ७१ झाडांचे रोपण केले जाणार आहे. हे केंद्र शिक्षण, संवर्धन आणि मनोरंजनाचा एकत्रित अनुभव प्रदान करते.

शहराच्या चारही बाजूच्या डोंगरात पडणारे पावसाचे पाणी वाहून जाते. ते साठवले तर भूजल पातळी वाढेल, बाेअर, विहिरींना पाणी येईल. लोकांना या तंत्रांची माहितीच नसल्याने देशातील पहिले ‘वॉटर लिटरसी सेंटर’ सुरू केलेहे. यातून मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास वाटतो. -डॉ. प्रियानंद आगळे, इकोनिड्स फाऊंडेशन

या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा योग्य आणि परिणामकारक वापर कसा करावा, यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पावसाच्या पाण्याचे संकलन, गटार पाण्याचे पुनर्वापर, पाण्याच्या अति-उपयोगाला आळा घालणे, अशा महत्त्वाच्या बाबींवर भर दिला जाणार आहे. याशिवाय, मुलांसाठी विशेष कार्यशाळा व नागरिकांसाठी जनजागृती उपक्रम राबवले जातील.

Econids Foundation च्या या उपक्रमामुळे केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर राज्यभर जलव्यवस्थापनासाठी एक नवा आदर्श निर्माण होईल. जलसाक्षरता केंद्र हे भावी पिढीसाठी शाश्वत विकासाचे एक प्रतीक ठरू शकेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *