UPSC चा निकाल लागला! मुलींची बाजी, मात्र, पुण्याच्या आर्चित डोंगरे महाराष्ट्रात पहिला, देशात तिसरा!

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल मंगळवार २२ एप्रिलला जाहीर झाला. शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.तर, तर, हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. अर्चित हा पुण्याचा असून तो देशात तिसरा तर, महाराष्ट्रात पहिला आला आहे. ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने 99 वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने 303 वा क्रमांक मिळवला आहे.
ML/ML/PGB 22 April 2025