फॅन्ड्री फेम अभिनेत्रीने केले धर्मपरिवर्तन

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फॅन्ड्री या सिनेमातून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हीने धर्मपरिवर्तन करून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मिडियावर तिने शेअर केलेल्या पोस्ट वरून तिने धर्म बदलल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तिचे चाहते खूपच नाराज झाले आहेत.
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती पाण्यात हात जोडून उभी आहे. आणि कॅप्शनमध्ये तिने बाप्तिस्मा स्वीकारल्याचं सांगितले. तसेच आणखी एका पोस्टमध्ये तिने काही ग्रुप फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ख्रिश्चन धर्मवासीय तिच्यासोबत पोज देतायत. या फोटोंमध्ये तिने कॅप्शन लिहिले की, कारण तुमच्यासाठी माझ्या योजना मला माहित आहेत असे प्रभू म्हणतात… पुढे तिने बाप्तिस्मा , नवीन सुरुवात, आयुष्य, प्रेम, राजेश्वरी खरात, ईस्टर असे हॅशटॅग दिले आहेत.
SL/Ml/SL
21 April 2025