एलॉन मस्क यांच्या आई सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांच्या माये मस्क आई सध्या भारत दौऱ्यावर असून नुकतेच त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. ७७ वर्षीय माये मस्क या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे फोटो व्हायरल झाले असून त्यांच्यासमवेत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसदेखील दिसत आहे.
माये मस्क यांनी ‘ए वुमन मेक्स अ प्लान’ हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी त्या मुंबईत आल्या आहेत. आज त्यांच्याहस्ते त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यानंतर त्यांनी ‘राजकमल बुक्स’ला टॅग करून पुस्तकांसोबत एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी पुस्तकाची हिंदी आवृत्ती भाषांतरीत करून प्रकाशित केल्याबद्दल राजकमल बुक्सचे आभार मानले आहेत.
जॅकलिननं सिद्धिविनायक मंदिरातील दर्शनानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये ‘माय डिअर फ्रेंड माये’ असा उल्लेख करत एलॉन मस्क यांच्या आईचं कौतुक केलं आहे. ” त्यांच्या पुस्तकातून एका महिलेचा लढा दिसून येतो. विशेषतः वय हा फक्त एक आकडा असून त्यावरून तुमच्या स्वप्नांचा किंवा ध्येयाचा अंदाज येऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया जॅकलिननं दिली आहे.
SL/ML/SL
21 March 2025