खडकपूर्णा जलाशयात हजारो माशांचा मृत्यू, परिसरात सुटली दुर्गंधी…

 खडकपूर्णा जलाशयात हजारो माशांचा मृत्यू, परिसरात सुटली दुर्गंधी…

बुलडाणा , दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील खडकपूर्णा जलाशयात अचानक हजारो माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. जलाशयात आणि काठावर मृत मासे दिसून येत असून, दुर्गंधीही सुटली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी याच जलाशयावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांमध्ये भीती, निर्माण झाली आहे. अद्याप माशांच्या मृत्यूचे ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. जलप्रदूषण, जलाशयात विषारी घटकांचा प्रवेश, बोटी नष्ट करताना वापरण्यात आलेल्या जिलेटिन स्फोटकांमुळे निर्माण होणारे रासायनिक दुष्परिणाम ही संभाव्य कारणे असण्याची शकतात वर्तवण्यात येत आहे. या घटनेत पर्यावरणीय समतोल बिघडण्याची आणि पाण्याची गुणवत्ता घसरल्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर तातडीने उपाययोजना करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी केली आहे.

ML/ML/PGB 19 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *