पैनगंगा नदीच्या पात्रात दुर्मिळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्म आढळले.

चंद्रपूर दि १८– चंद्रपूर तालुक्यात वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० वर्षांपूर्वीचे लुप्त झालेल्या दुर्मिळ स्टेगोडॉन हत्तीचे जीवाश्म भूशास्त्र संशोधक सुरेश चोपणे यांनी शोधले आहेत. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची प्लेईस्टोसीन काळातील हत्तीची जीवाश्मे आढळली असून, यासोबत पाषाणयुगीन अवजारेही सापडली आहेत.विदर्भातील ही शोधलेली जीवाश्मे २३ ते २६ हजार वर्षांपूर्वीच्या स्टेगोडॉन गणेश (Stegodon Ganesa) प्रजातीची असल्याचे मत वाडिया इन्स्टिट्यूटचे निवृत्त प्राध्यापक अविनाश नंदा यांच्यासह परदेशी संशोधकांनी व्यक्त केले. हत्तींचे दात, डोक्याची कवटी, मांडी आणि छातीची हाडे यांचा यात समावेश आहे. हा ऐतिहासिक शोध प्लेईस्टोसीन काळातील जीवाश्म अभ्यासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रात स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *