मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मदतीतून, चिमुकल्याची श्रवणशक्ती परतली !

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मदतीतून, चिमुकल्याची श्रवणशक्ती परतली !

मुंबई, दि. १६ – सात वर्षांपुर्वी ‘कॉक्लेअर इंप्लांट’ केलेल्या चिमुकल्याच्या मशिनचा प्रोसेसर बंद पडला. परिणामी मुलाला ऐकण्यासाठी अडथळा येवू लागला. खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करणाऱया वडिलांच्या खिशाला प्रोसेसर आणि शस्त्रक्रियेचा खर्च परवडणारा नव्हता. व्यथीत झालेल्या पालकांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष धावून आल्याने श्रवणशक्ती गेलेल्या १३ वर्षीय सिद्दीकची पुन्हा एकदा श्रवण शक्ती परत आल्याचे समाधान सिद्दीकच्या पालकांनी व्यक्त केले.

सोलापुर जिल्ह्यातील, बार्शी येथे शकील शेख यांच्या मुलाला ऐकू येत नव्हते. चिंतेत असणाऱया आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणीनंतर त्याला जन्मतः श्रवणशक्ती नाही, हे निदान झाले. त्यावर एकमेव उपाय म्हणजे ‘कॉक्लेअर इंप्लांट’. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेला खर्च शेख कुटूंबियांना परवडणारा नव्हता. पुढे त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कडे धाव घेतली. त्यातून झालेल्या मदतीतून सिद्दीक याच्यावर कॉक्लेअर इंप्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.

शस्त्रक्रियेनंतर दुसरा टप्पा

काही वर्षानंतर, कॉक्लेअर इंप्लांटचा प्रोसेसर बंद पडला, आणि पुन्हा सिद्दीकला श्रवणदोष सुरू झाला. सुरूवाती प्रमाणे परत शकील शेख यांच्यापुढे सिद्दीकच्या महागड्या उपचाराचा प्रश्न उपस्थित झाला होता. दरम्यान स्थानिक आमदार दिलीप सोपल यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केली. पुढे मुख्यमंत्री यांची लेखी शिफारस आणि कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील केईएम रूग्णालयात सिद्दीकवर शस्त्रक्रिया करून कॉक्लेअर इंप्लांटचा प्रोसेसर बदलण्याकरिता पाऊले उचलली गेली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *