ट्रम्प यांचा अनपेक्षित ९० दिवसांचा विराम,आर्थिक भूकंपानंतर दिलासा

 ट्रम्प यांचा अनपेक्षित ९० दिवसांचा विराम,आर्थिक भूकंपानंतर दिलासा

मुंबई, दि. 13 (जितेश सावंत) :

Trump’s Unexpected 90-Day Pause: A Relief After the Economic Quake
अत्यंत अस्थिर अश्या आठवड्याची सुरुवात फार मोठ्या घसरणीने झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुल्काला चीनच्या प्रत्युत्तराने ,जागतिक बाजारात मोठा आर्थिक भूकंप झाला त्याचा फटका भारतीय बाजाराला देखील झाला. परंतु अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्पर करांवर प्रत्युत्तर न देणाऱ्या 75 देशांना 90 दिवसांचा अनपेक्षितपणे विराम दिल्याने आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला.
The week began with a sharp market fall due to China’s retaliation to US tariffs, impacting global and Indian markets. However, a 90-day pause on tariffs by President Trump provided some relief.

अमेरिकेच्या शुल्कवाढीला घरातूनच विरोधाचा सूर, गुंतवणूकदारांसाठी संधीचा काळ?

अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीविरोधात देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर विरोध निर्माण झाला आहे. अनेक अर्थतज्ज्ञ, सामाजिक संस्था, कामगार संघटना आणि सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून या धोरणाविरोधात आंदोलन करत आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय अनपेक्षित आणि अनाकलनीय असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच त्यांनी ९० दिवसांचा शुल्कवाढीवरील विराम देण्याचा निर्णय घेतला, जो या अनिश्चिततेचाच एक भाग मानला जातो.

शनिवारी रात्री ट्रम्प प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, स्मार्टफोन, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अमेरिकेच्या आयात शुल्कातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता या वस्तू आयात करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
तसेच ही ९० दिवसांची सूट तात्पुरती आहे.त्यानंतर काय निर्णय घेतले जातील, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने बाजारात अनिश्चितता कायम आहे.पुढील काही महिने हे बाजारासाठी अस्थिरतेचे असणार आहेत. अशा परिस्थितीत, शहाण्या गुंतवणूकदारांनी सध्याच्या घसरणीचा लाभ उठवून दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी शोधावी.

There has been significant domestic opposition to the US tariff hikes, with economists, social organizations, labor unions, and citizens protesting. President Trump’s decisions appear unexpected and unclear. In response, he announced a 90-day pause on tariff increases, which is seen as part of the ongoing uncertainty. Additionally, electronics like smartphones and computers have been exempted from import tariffs. However, this exemption is temporary, leaving the market uncertain about future decisions. This period is expected to remain volatile, and savvy investors may find opportunities in the current downturn for long-term investments.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष (Q3FY25) साठी कंपन्यांचे मार्च तिमाही निकाल,भारताचा किरकोळ महागाईचा डेटा (India’s retail inflation data), जागतिक दर घोषणा (tariff announcements) आणि जागतिक संकेत ,रुपयाची चाल, अमेरिकन डॉलरची कामगिरी (movement of the US dollar)आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती (international crude oil prices. यावर असेल.

In the coming week, investors will focus on Q3FY25 company earnings, India’s retail inflation data, global tariff announcements, global cues, rupee movement, US dollar performance, and international crude oil prices.

भारतीय शेअर बाजार 14 एप्रिल (आंबेडकर जयंती) आणि 18 एप्रिल (गुड फ्रायडे) रोजी बंद राहील. पुढील आठवड्यात केवळ 15 ते 17 एप्रिल या तीनच ट्रेडिंग दिवस असतील.
Indian stock markets (BSE & NSE) will be closed on April 14 (Ambedkar Jayanti) and April 18 (Good Friday). Only three trading days next week: April 15–17.

Technical Analysis of Nifty:

Closing on Friday: Nifty closed at 22828.05
KeySupportLevels:,22798,22744,22,681,22650,22642,22560,22552,2239722329,22314,22245,22105,22082,21974,and 21792. Breaking these could lead Nifty to further lower levels.
ResistanceLevels:,22865,22904,22929,22979,22992,23092,23163,23195,23350,23382,23402,23424,23451,23519.30 23543, 23591, 23600, 23631, 23701, 23736, 23751, 23800, 23850, and 23869. These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.

लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.

The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.

ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant

JS/ML/PGB 13 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *