उपवासासाठी झटपट राजगिऱ्याच्या थालीपीठाची रेसिपी

 उपवासासाठी झटपट राजगिऱ्याच्या थालीपीठाची रेसिपी

मुंबई, दि. 12 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उपवासाच्या दिवशी जेव्हा झटपट आणि चविष्ट काही खायचं असेल, तेव्हा राजगिऱ्याचं थालीपीठ हा उत्तम पर्याय आहे. हे थालीपीठ बनवायला सोपं, पौष्टिक आणि झटपट तयार होतं. उपवासात खाण्यासाठी योग्य असल्याने ते सहज बनवून खाता येतं आणि पचनासही हलकं पडतं.साहित्य :राजगिऱ्याचं पीठ – १ कपउकडलेले बटाटे – २ मध्यम आकाराचे (चिरून घ्यावेत)हिरवी मिरची – २ (बारीक चिरून)जिरं – १/२ टीस्पूनलिंबाचा रस – १ टीस्पूनसैंधव मीठ – चवीनुसारकोथिंबीर – २ टेबलस्पून (बारीक चिरून)तूप / तेल – थालीपीठ भाजण्यासाठीकृती :१. सर्वप्रथम एका मोठ्या परातीत राजगिऱ्याचं पीठ घ्या. त्यात उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, जिरं, सैंधव मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.२. त्यात थोडं थोडं पाणी घालून एकसंध पण थोडंसं सैलसर पीठ भिजवा.3. पीठ तयार झाल्यावर, एका प्लास्टिक शीटवर किंवा केळीच्या पानावर थोडं तेल लावा आणि त्यावर थालीपीठ थापून घ्या.4. गरम तव्यावर थोडं तूप सोडून थालीपीठ दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजा.5. गरमागरम थालीपीठ दही किंवा उपवासासाठी तयार चटणीसोबत सर्व्ह करा.उपवासात आवश्यक ती ऊर्जा आणि चविष्ट अनुभव हे थालीपीठ देतं. झटपट तयार होत असल्याने अचानक आलेल्या उपवासाच्या दिवशी देखील ही रेसिपी नक्कीच कामी येते.ML/ML/PGB 12 एप्रिल 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *