कचऱ्याचं वर्गीकरण – पर्यावरण संवर्धनासाठी पहिलं पाऊल

मुंबई, दि. 10 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कचऱ्याचं योग्य प्रकारे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकचा पुनर्वापर, आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे ही काही महत्त्वाची पावलं आहेत.
घराबाहेर पडणारा कचरा योग्य प्रक्रियेतून पुन्हा वापरण्यायोग्य केला तर डंपिंग ग्राउंडवरील भार कमी होतो. तसेच, कंपोस्टिंगसारख्या उपाययोजनांमुळे बागकामासाठी सेंद्रिय खत तयार करता येते. या सवयींमुळे आपण पृथ्वीला अधिक काळजीपूर्वक जपू शकतो.
ML/ML/PGB 10 एप्रिल 2025