महाबळेश्वर – सह्याद्रीच्या कुशीतलं थंड हवेचं नंदनवन

मुंबई, दि. 10 एप्रिल 2025 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात वसलेलं महाबळेश्वर हे हिल स्टेशन निसर्गप्रेमींना आणि थंड हवामानाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी स्वर्ग आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे ठिकाण त्याच्या गडद धुक्याने, हिरव्यागार दऱ्यांनी आणि टोकावरून दिसणाऱ्या अप्रतिम दृश्यांनी प्रसिद्ध आहे.
महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक, आर्थर सीट, एलफिन्स्टन पॉईंट, विल्सन पॉईंट अशा अनेक निसर्गरम्य ठिकाणांचा समावेश आहे. ताज्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन आणि थंड हवामानामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरते. विविध साहसी क्रिडा, बोटिंग, आणि निसर्गभ्रमंती यांचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्वर उत्तम पर्याय ठरतो.
ML/ML/PGB 10 एप्रिल 2025