ट्रम्प यांची टॅरिफला ९० दिवसांसाठी स्थगिती, चीनला मात्र, दाखवला इंगा

 ट्रम्प यांची टॅरिफला ९० दिवसांसाठी स्थगिती, चीनला मात्र, दाखवला इंगा

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आय़ातशुल्क वाढीची घोषणा केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. शेअर बाजारांवरही याचा परिणाम दिसून आला. मात्र, आता ट्रम्प यांनी 75 हून अधिक देशांना तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यांनी बहुचर्चित आयातशुल्क वाढीच्या धोरणावरून माघार घेत परस्पर आयात शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित केले आहे. मात्र, या सूटमध्ये चीनचा समावेश केलेला नाही. उलट चीनवरचे शुल्क 104 टक्क्यांवरून 125 टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे. चीनने प्रत्युत्तरादाखल 84 टक्के शुल्क लादल्यानंतर ट्रम्प यांनी ही कारवाई केली. ट्रम्प यांनी चीनने जागतिक बाजारपेठेचा आदर दाखवलेला नाही. म्हणूनच मी ते शुल्क 125 टक्क्यापर्यंत वाढवत आहे. आशा आहे की चीन लवकरच समजेल की अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस संपले आहेत, असे सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *