पाण्याअभावी मोसंबीच्या बागा संकटात…..

 पाण्याअभावी मोसंबीच्या बागा संकटात…..

जालना दि ९ — जिल्ह्याला मोसंबीचे कोठार म्हटले जाते, जिल्ह्यात मोसंबीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. जालना जिल्हा आवर्षणग्रस्त असल्याने मध्यंतरी पडलेल्या दुष्काळात मोसंबीचे क्षेञ मोठ्या प्रमाणात कमी झाले होते.त्यानंतर पाऊसमान चांगले राहिल्याने त्यात मोठी वाढ झाली.पण पुन्हा एकदा अनेक गावांतील मोसंबी फळबाग संकटात सापडलेल्या आहेत.

अंबड तालुक्यातील शिराढोण येथील परिस्थिती चिंताजनक आहे. मार्च महिन्यातच शिराढोण गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतातील फळबागांना फटका बसू लागला आहे. या भागातील काही शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन फळबाग वाचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यंदा या परिसरात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

विहिरींनी अक्षरशा: तळ गाठला आहे.मात्र आता, हातात पैसा नसल्याने हतबल झालेला शेतकरी, मोसंबीच्या बागा डोळ्यात पाणी आणून तोडताना दिसत आहेत, अंबड तालुक्यातील शिराढोण येथील शेतकरी बाबुराव भिकनराव गाडेकर यांनी त्यांच्या गट नंबर १०१ मधील शेतात असलेल्या दोनशे मोसंबीच्या झाडावर पाण्याअभावी जेसीबी चालवली असून ,विहिरीने तळ गाठले असल्याने , आता मोसंबीची बाग जगवणे शक्य नसल्याने, विकतचे पाणी परवडत नसल्याने हा मोसंबीचा बाग तोडत असल्याचे गाडेकर यांनी सांगितले.

गाडेकर यांनी २०१८ मध्ये म्हणजे सात वर्षांपासून मोठ्या कष्टाने मोसंबीचा बाग वाढवून जगवला लेकराप्रमाणे जीव लावून एक एक झाडं मोठी केली.आता कुठे एक दोन वर्षांपासून या बागेतून त्यांना उत्पन्न देखील मिळायला सुरू झाले होते. मात्र यंदा पाऊस अत्यंत कमी झाल्याने , विहिरीने फेब्रुवारी , मार्च महिन्यात तळ गाठला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *