गुड न्यूज, RBI कडून रेपो रेटमध्ये कपात, कर्ज होणार स्वस्त

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केल्याने आता रेपो रेट हा 6 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात महागाई दर 3.61 टक्क्यांवर घसरला आहे. तर हाच दर जानेवारी महिन्यात 4.26 टक्के होता. त्यामुळे रेपो रेटमध्ये कपात होईल, अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा खरी ठरल्याने सामान्य गुंतवणुकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.या निर्णयामुळे आगामी काळात बँकांकडून गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे.